loader

मी सौ.वर्षा जयंत चाचरकर, माझा विवाह २००७ मध्ये झाला असून माझ्या विवाहाला ०९ वर्ष पूर्ण झालेली होती. या ०९ वर्षात अपत्य प्राप्ती करीता विविध डॉक्टराकडे औषधी उपचार केले. त्याच प्रामुख्याने आठ वेळा आय.यु.आय (I.U.I) व एक वेळा आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धतीच्या अवलंब केले होते त्यात यश आले नाही.

विवाहाच्या ०९ व्या वाढदिवसाच्या रोजी दि.२०/०६/२०१६ ला आम्ही दाम्पत्य वरदान हॉस्पिटल कणकवली येथील डॉ.मिनल नागवेकर मॅडम याना भेटलो व त्यांना संपूर्ण माहिती दिली. व आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धत अवलंब करणेबाबत विचारणा केली. त्यावेळी डॉ मिनल नागवेकर मॅडम यांनी काही तपासण्या करण्यास  सांगितल्या. त्या तपासण्या पॉझिटिव्ह आल्यात व त्यानंतर त्यांनी आय.व्ही.एफ (I.V.F.) बाबत योग्य उपचार पद्धती अवलंबून सखोल मार्गदर्शन केले. तसेच हॉस्पिटल मधील त्यांचे इतर कर्मचारी व सहकारी यांनी चांगल्या प्रकारे उपचार केला व काळजी घेतली. त्यामुळे आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धती सफल झाली. व ०६ महिन्याच्या आत पॉझिटिव्ह रिझल्ट आला. दि.२९/०९/२०१७ रोजी मला मुलगा व मुलगी अशी जुळी अपत्ये झाली.

डॉ मिनल नागवेकर मॅडम यांच्या सकारात्मक उपचार पद्धतीमुळे माझ्या आयुष्यात आशेचे किरण उदयास आले व माझे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. वरदान हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात चांगल्या प्रकारची औषधोपचार तसेच बहुपयोगी सल्ला मिळतो. मला त्यांच्या उपचार पद्धतीमुळे मुलगा व मुलगी अशी ०२ अपत्ये प्राप्त झालेली आहेत. हे मला मिळालेली वरदानच आहे.

वरदान हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वरदान हॉस्पिटलच्या डॉ मिनल नागवेकर मॅडम व त्याचे इतर सहकारी याना खूप खूप हार्दिक शुभेच्या ! व त्यांचे खूप खूप आभार वरदान हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीकरता माझ्या मनपूर्वक शुभेच्या……!

वर्ष २०१८ ……माझ्या आणि माझ्या पत्नीच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचे वर्ष ठरले……. अखेर १३ वर्षaच्या प्रतिक्षेनंतर गोड बातमी मिळाली……. मागील १३ वर्षामध्ये बाळ होण्यासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढेहि अयशस्वी ठरले. शेवटी आमच्यासाठी वरदान ठरले ते कणकवलीचे “वरदान हॉस्पिटल”

मागील १३  वर्षात बाळासाठी सर्व प्रयत्न करून अक्षरशः हताश झालेलो असताना वरदान हॉस्पिटलमधील डॉ. मिनल नागवेकर यांनी आमचे मनोधेर्य वाढवले. तसेच आम्हाला बाळ होऊ शकते याची संपूर्ण खात्री देखील दिली ………..यापूर्वी बऱ्याच हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी अश्या प्रकारचे शब्द देण्याचे प्रकार आमच्या बाबतीत घडले होते. परंतु दिलेला शब्द सत्यात उतरवला तो मात्र वरदान हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी……

पुढे डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्यानंतर आम्हाला बाळ होणार याची खात्री मिळाली. तीही पाचव्या महिन्यात जुळी मुलं असल्यान आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. प्रसूती सीझर पद्धतीने झाली मुलाचे वजन १३०० ग्रॅम आणि मुलीचे अवघे ७०० ग्रॅम मुलगी अगदी नाजूकच असल्याने प्रसूतीच्या १५ दिवसानंतर तिला दूध पिण्यास त्रास होऊ लागला. व पुढे प्रकृती गंभीर होत असल्याचे बघून डॉक्टरांनी विशेष उपचार आणि काळजी घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आम्ही सुटकेचा निस्वास टाकला.

अशाप्रकारे वरदान हॉस्पिटल आणि तिथल्या डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास दाखवल्याने एका पेक्षा दोन बाळाचे वरदान मिळाले …………….त्याबद्दल वरदान हॉस्पिटलचे तसेच डॉ मिनल नागवेकर यांचे आभार मानावे तेवढे कमीच सोबत डॉ गौरी मॅडम व डॉ अश्विनी मॅडम यांचेही सहकार्य मिळाले तसेच नर्स स्टाफ मधील हरम (तांडेल), मिठबावकर, मेस्त्री, लुसी आणि म्हापसेकर यांचेही खूप खूप आभार आणि धन्यवाद ……!

© 2025 ankurivfcentre, All Rights Reserved